
वाळुज महानगर, (वार्ताहर) – बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात रस्त्याच्या कडेला हँडल लॉक करून उभी केलेली!20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात आरोपींनी अर्ध्या तासात लंपास केली. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीचा आशय असा, शरणापुर येथील अशोक साहेबराव तुपे याने त्याच्या काकाची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच 20, डीए -8018) ही 20 हजार रुपये किमतीची दुचाकी 22 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात रस्त्याच्या कडेला हँडल लॉक करून उभी केली होती. अर्ध्या तासानंतर तो दुचाकी लावलेल्या ठिकाणी आला असता ती लंपास झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
