
वाळूजमहानगर, (ता.9) – जागतिक महिला दिनानिमित्त पंतजली योग समिती बजाजनगर व योगवर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय योग शिबीराची सांगता शनिवारी (ता.8) रोजी महिलांचा सन्मान करून मोठ्या उत्साहात करण्यात आली.

महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सहा दिवशीय योग शिबिराच्या सांगता प्रसंगी वातावरण शुद्धतेसाठी होम हवन व महिलांचा सन्मान करण्यात आला. 
यावेळी उद्योजक हनुमान भोंडवे, कैलास भोकरे, अनिल चौरडीया, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य रेखा सूर्यवंशी, सुभाष आवताडे यांची प्रमुख उपस्थीती होती. या प्रसंगी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपल्या जीवनामध्ये आरोग्य अभियानाचा पाठ आणावा आणि एक तास स्वत:साठी द्यावा. असे अवाहन पतंजली योग समितीचे मार्गदर्शक योगगुरु नवसरे यांनी यावेळी केले. 
शिबीर यशस्वीतेसाठी कृष्णकुमार चौरसिया, जनार्धन निकमपाटील, विनोद वडोदकर, अशोक मानकर, कैलास निकम, कृष्णा पाटील, अंकुश भानुसे, कल्याण तवले यांच्यासह श्रीराम मंदिर स्थायी वर्गाचे साधक तसेच योगा प्रेमींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पना मानकर यांनी केले.
