वाळुज महानगर, (ता.14) – बजाजनगर येथील विविध मंदिरांमध्ये विश्व हिंदू परिषद, अर्चक आयाम जनसेवा फाउंडेशन, गरुड झेप अकॅडमी, पतंजली योग परिवार आणि मंदिर प्रतिनिधी यांच्यावतीने शनिवारी 12 ऑक्टोंबर रोजी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानाची सुरुवात त्रिमूर्ती चौकातील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरपासून झाली. यावेळी बजाजनगर परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, महादेव मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रामेश्वर महादेव मंदिर, चिंचवण कॉलनीतील संतसेना महाराज मंदिर, आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिर,
श्री अय्यप्पा स्वामी मंदिर, संत सावता महाराज मंदिर, जय हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा मंडळ, काशी विश्वनाथ मंदिर, जैन मंदिर, पावन हनुमान मंदिर, व्यापारी गणपती मंदिर, संत रोहिदास महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, मोहटा देवी मंदिर, जागृत हनुमान मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, आसाराम बापू केंद्रा शेजारील गणपती मंदिर, श्री खंडोबा मंदिर, लक्ष्मी माता मंदिर आदी मंदिराचा गाभारा व परिसर
तसेच बजाजनगर, सिडको वाळूज महानगर येथील रस्त्याच्या बाजूला साचलेला प्लास्टिक युक्त कचरा झाडून स्वच्छ करत तो जाळून टाकण्यात. या अभियानात गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक निलेश सोनवणे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सक्रिया भाग घेतला.
स्वच्छता अभियाना दरम्यान विद्यार्थी व स्वयंसेवकांसाठी चहा, पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मंदिरांकडून खराटे, झाडू, टोपले, फावडे यांसारख्या साहित्याची व्यवस्था करून देण्यात आली होती.
