February 5, 2026

  1. वाळूजमहानगर, (ता.3) – रांजणगाव (शेणपुंजी) कडून पंढरपूरकडे जाणाऱ्या 35 वर्षीय कार चालकावर अज्ञात इसमांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कारच्या काचा फोडण्यात आल्या असून कार चालक सुद्धा जखमी झाला आहे. हा प्रकार बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात मंगळवारी (ता.3) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की कार (एम एच 20, एफ पी -9445) चा चालक शेख जमील शेख बशीर (वय 35) रा. बोरगाव सारवणी ता.सिल्लोड. हा मंगळवारी (ता.3) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास कार मधून वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) कडून पंढरपूरकडे जात होता. दुपारी 4 वाजेच्या सुमारास शेख जमिल याची कार महाराणा प्रताप चौक, बजाजनगर येथे येताच अज्ञात इसमांनी कारवर लाट्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कारची समोरील, पाठीमागील व बाजूच्या काचा फुटल्या. तसेच कारचालक शेख जमील हा जखमी झाला. घटनेनंतर जखमी कारसह पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यास मेडिकल मेमो देऊन उपचारार्थ घाटी रवाना केले. या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा हल्ला लुटमारीच्या उद्देशाने झाला, किंवा इतर कारणावरून त्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *