
वाळूजमहानगर, (वार्ताहर) – पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हा प्रमुख कैलास भोकरे व ग्रामपंचयात सदस्या मंदा भोकरे यांच्या वतीने बजाजनगर येथील बालगिरी महाराज यांच्या गौशाळा येथे शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी चारा वाटप व ग्रंथ पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 11 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, युवासेना कार्यकारिणी सदस्या हर्षदा शिरसाट, नगरसेवक सिध्दांत शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे अवाहन कैलास भोकरे यांनी केले आहे़.
