
वाळूज महानगर (ता.6) – दिव्यांग आधार व पूनर्वसन बहुउद्येशीय सामाजिक संस्था बजाजनगरच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित कर्तृत्वान दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला. त्यात बद्रीनाथ लघाने, रुस्तुम निकम, विशाल पाचपोळ, सरोजा भोसले, अजयकुमार जयस्वाल, शिवकन्या पाडेकर यांचा विशेष सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत दिव्यांग आधार व पूनर्वसन बहुउद्येशीय सामाजिक संस्थेचे सचिव विष्णूदास पाटील यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहीती दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष दता वाकडे यांनी दिव्यागाच्या समस्या व संस्थेने दिव्यांगासाठी केलेले कार्य याविषयी माहीती दिली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष निलेश सोनवणे प्रमुख पाहणे योगेश पाटील, भाऊलाल दुबीले, संतोष डव्हान, गोविंद आप्पा डांगे, सामाजिक कार्यकर्ते आसाराम कर्पे, संस्थेचे उपाध्यक्ष पारसचंद साकला, कोषाध्यक्ष किशोर फेगडे, शिवाजी रोगट, सहसचिव लक्ष्मण धडेकर, बद्रीनाथ लघाणे, गणेश आहेर, गुजर आप्पा, विठ्ठल भवर, दिव्यांग महिला ज्योती कदम, उज्वला फेगडे, शिवानी वाकडे, समिधा फपाळ, पाईकराव, सुनिल कांबळे व परिसरातील दिव्यांगाची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. महादेव संकपाळ यांनी केले. तर आभार शिवाजी दांगटराजे यांनी मानले.
