March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.1) – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना पश्चिम बजाजनगर शाखेच्या वतीने बजाजनगर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तालुकाप्रमुख विष्णू जाधव, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, शहरप्रमुख विशाल खंडागळे, युवासेना तालुका युवा अधिकारी विजय वाडेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख रतन नलावडे यांनी पुढाकार घेतला. या प्रसंगी उपतालुकाप्रमुख लक्ष्मण लांडे, विभाग प्रमुख संजय मुरादे, रोहिदास चव्हाण, संतोष चंदन, विनोद दाभाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य काकाजी जीवरग, बजरंग पाटील, उपविभागप्रमुख अशोक कटारे, सुनील गोरे, युवासेना उपतालुकाअधिकारी अमोल होर्शील, राहुल जाधव, युवासेनेचे ओम देशमुख, संशोधन सावते, वंशराज देशमुख, भागवत रेंगे शाळेच्या मुख्याध्यापिका बी एम सूर्यवंशी, शिक्षिका मंदा आकोलकर-काळे, युवा प्रशिक्षक ओजस्विनी सुरवसे शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *