March 28, 2026


वाळूज महानगर, (ता.10) – कोणत्याही तरुणीची फसवणूक होऊ नये, म्हणून वाळूज परिसरातील जवळजवळ दीडशे (दुर्गा) तरुणींना” द केरला स्टोरी ” हा चित्रपट वाळूज महानगरातील एका सिनेफ्लेक्स मध्ये सकाळी 10:30 ते दुपारी 1:00 या वेळेत मोफत दाखविण्यात आला.

बजरंग दल वाळूज प्रखंड संयोजक सुमित अनिलकुमार चोरडिया यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रम प्रसंगी विश्व् हिंदू परिषदेच्या प्रांत उपाध्यक्षा कुंदाताई अंधुरे, विश्व् हिंदू परिषदेच्या अंतर्गत असलेल्या मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका संजीवनी देशपांडे, बालसंस्कार प्रांत संयोजिका प्रतिभा पोहीकर, जिल्हा संयोजिका नंदा क्षीरसागर, शहर सह संयोजिका सायली टिल्ले, नांदेड शहर संयोजिका मंजुषा देशपांडे, दुर्गा वाहिनीच्या प्रांत संयोजिका द्रौपदी गायकवाड, प्रखंड संयोजिका विद्या घुगे व मातृशक्ती व दुर्गा वाहिनीचे पदाधिकारी तसेच देवगिरी प्रांतातील दुर्गा उपस्तित होत्या.

   फसवणूक टाळण्यासाठी चित्रपट पाहावा –
तरुणीनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये व फसवणूक करून घेऊ नये. या करिता विश्व् हिंदू परिषदे च्या अंतर्गत असलेल्या दुर्गा वाहिनी व बजरंग दल यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम असल्याचे बजरंग दल वाळूज प्रखंड संयोजक सुमित अनिलकुमार चोरडिया यांनी सांगितले. तसेच परिसरातील सर्वांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहानही विश्व् हिंदू परिषदे च्या वतीने करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *