
वाळूजमहानगर, (ता.17) – बंद असलेल्या स्टोन क्रेशर कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी स्टार्टर ऑइल, केबल, इलेक्ट्रिक डीपी मधील कॉपर वायर, व तीस एचपीची इलेक्ट्रिक मोटर असा सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दहेगाव बंगला येथे घडलेली ही चोरीची घटना 13 जून रोजी सकाळी उघडकीस आली.
लिजी बिनु जॉय (44) रा. नंदनवन कॉलनी छावणी औरंगाबाद यांचे दहेगाव बंगला येथील गट नंबर 175 मध्ये खडी क्रेशरचे मशीन आहे. ते सुमारे दीड वर्षापासून बंद आहे. त्या ठिकाणी शमीम शेख असद हा वॉचमन म्हणून नोकरीला आहे. 13 जून रोजी सकाळी तो चक्कर मारण्यासाठी आला असता त्यास जुने वापरते स्टार्टर ऑइल तसेच त्याचे केबल किंमत अंदाजे 40 हजार रुपये, 65 केवीची इलेक्ट्रिक डीपी त्यातील कॉपर वायर किंमत अंदाजे 50 हजार रुपये, तसेच बाजूलाच असलेली 30 एच पी ची मोटर कॅपॅसिटर सह अंदाजे किंमत 30 हजार रुपये असा एकूण 1 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
