February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.31) – पीक कर्ज देण्यात यावे, यासाठी कागदपत्राची पूर्तता करूनही बँक पीक कर्ज देईना. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बँकेला कुलूप ठोकून बँक अधिकाऱ्यांना बँकेतच सुमारे तासभर कोंडून ठेवले. हे अनोखे आंदोलन तुर्काबाद (खराडी) येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकत शुक्रवारी (ता.30) रोजी झाले.

याबाबत शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या तुर्काबाद शाखेत परिसरातील शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केला. मात्र आश्वासनाशिवाय बँक काहीच देईना. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या विरोधात घोषणा देत रोष व्यक्त करत शुक्रवारी (ता.30) रोजी बँक सुरू होताच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेत कोंडून बाहेरून कुलूप लावले.

जोरदार घोषणाबाजी केली. परिणामी सुमारे तासभर बँक अधिकारी आत मध्येच अडकले. शेवटी बँक व्यवस्थापकाने वरिष्ठांशी संपर्क घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले.

यावेळी नारायण आगळे, नानासाहेब रहाटवाड, अनिल रोकडे, शेख इस्माईल शेख शमशोद्दीन, मन्नान मोहम्मद शेख, काकासाहेब खोमणे, बद्रीनाथ दिवटे, भागिनाथ दिवटे, गोपीचंद भराड, बाबासाहेब पेहरकर, कृष्णा आगळे, संतोष वैद्य, अर्जुन बोचरे, बाळासाहेब शेळके, रामहरी आगळे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार
शेतकरी राजा असे आपण शेतकऱ्याला म्हणतो. मात्र हा राजा नसून त्याला दिलेली ती एक फक्त मोठेपणाची पदवी आहे. आज शेतकऱ्यांची सर्वच बाजूने हेडसांड होताना दिसत आहे. याच शेतकऱ्याला खत, औषधी तसेच बी बियाणे खरेदी करण्यापासून हाती आलेले पीक विकण्यापर्यंत वेठीस धरल्या जाते. त्यात नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला नसलेला योग्य भाव, व्यापारी सावकाराकडून होणारी लूट. यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक दृष्ट्या हतबल झालेला असतानाच बँकेकडूनही पीक कर्जासाठी त्याला वेठीस धरल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *