वाळूजमहानगर – जुन्या भांडणाच्या कारणावरून वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे दोन जणांनी सागर सदार यांच्यावर गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले. या आरोपींचा वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कसोशीने शोध घेऊन चिखली येथून आरोपी गजानन मोर याला शुक्रवारी (ता.21) रोजी जेरबंद केले.
कमळापूर येथील सागर सदार व त्यांचा मित्र जावेद पठाण हे दोघे शुक्रवारी (ता.14) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सोबत घर येत असतांना त्यांचे घराच्या परिसरात राहणारे गजु मोरे व प्रभु चव्हाण यांनी सागयची मोटार सायकल अडवु काय रे तुला जास्त माज आला का? असे बोलून दम देत असतनां त्यास सजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रभु चव्हाणने हातातील तलवार सागरच्या खंद्यावर मारली परंतु पाठीवर बॅग असल्याने वार चुकला. दरम्यान सागरने दोन्ही आरोपीस समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी गजु मोरे याने गावटी बंदुकीने फायर केले. त्यात सागरच्या उजव्या बरगडीजवळ गोळी लागली व रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर आजुबाजुचे लोक जमा झाल्याने दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन पळुन गेले. या प्रकरणी सागर सुभाष सदार, वय 28 वर्षे, रा. कमळापुर, हनुमान याच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपासात पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आरोपीतांचा शोध घ्याण्यासाठी 5 अधिकारी यांचे पाच पथक तयार करुन तात्काळ आरोपींच्या मुळगावी तसेच परभणी, नांदेड, जालना, नाशिक, लोणार, बुलडाणा येथे रवाना केले. या पथकांने आरोपीचा माघ घेऊन शुक्रवारी (ता.21) रोजी फरार असलेला आरोपी गजानन सुभाष मोरे यास चिखली, जि. बुलडाणा येथून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप गुरमे तसेच पोउपनि. चेतन ओगले, पोउपनि. राहुल निर्वळ, पोना. बाबासाहेब काकडे यांनी केली.
तपास चालू आहे …..
दरम्यान या प्रकरणातील आणखी एक फरार असलेला आरोपी प्रभू। चव्हाण हा अद्यापही फरारच आहे. शिवाय या गुन्ह्यात वापरलेली गावठी बंदूक (पिस्तूल) व तलवार जप्त करण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.