March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.11) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियलस मॅनेजमेंट छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने दुसऱ्या ‘प्रोक्यूमेंटअँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेचे आयोजन शुक्रवारी 12 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा ऑटो क्लस्टर वाळूज येथील नानासाहेब भोगले सभागृहात करण्यात आले आहे.
आय आय एम एम छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने खरेदी आणि पुरवठा यासाठी व्यवस्थापनाच्या या परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत पुरवठा साखळी व्यवस्थापनातील नवनवीन तंत्रज्ञान, खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचे उपाय तसेच उद्योग व्यवस्थापनातील भविष्यकाळातील आव्हाने व संधी यावर सविस्तर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. परिषदेच्या आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.
या एकदिवसीय परिषदेत पाच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे उद्घाटन ए. आय.टी.जी उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच उद्योगपती रामचंद्र भोगले यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेच्या पहिल्या सत्रात Endurance टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी उपाध्यक्ष प्रीती राज यांचे ‘वुमन्स इन इंडस्ट्री अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. दुसऱ्या सत्रात संजीव ऑटो पार्टसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप तांबे यांचे ‘पीक्यूसीडीएम इन सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तिसऱ्या सत्रात ग्रेड- अपच्या संस्थापक अध्यक्ष शितल अग्रवाल या ‘लीडरशिप स्किल्स फॉर एमर्जिंग मॅनेजर्स’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. चौथ्या सत्रात Endurance टेक्नॉलॉजीचे उपमहाव्यवस्थापक प्रसाद उपाध्याय यांचे ‘स्ट्रॅटेजीक सोर्सिंग’ या विषयावर सत्र होणार आहे.
पाचव्या सत्रात एप्रिकूल एअरकॉनचे संचालक तथा आय आय एम एम छत्रपती संभाजीनगर शाखेचे सचिव पारस मुथा यांचे ‘फ्युचर ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. या संधीचा सर्व उद्योजकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आय आय एम एम छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष सुशांत पठारे यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *