वाळूज महानगर, (ता.28) – बजजानगर येथील एका 42 वर्षीय कामगार ठेकेदार असलेल्या प्रियकराने सिडको वाळूजमहानगर येथील प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (ता.26) रोजी सकाळी उघडकीस आली.
एकनाथ साहेबराव शेजुळ (42) (रा.बजाजनगर, हायटेक कॉलेज जवळ या कामगार ठेकेदाराचे सिडको वाळूमहानगर येथील एका महिलेबरोबर प्रेम संबंध होते. तिच्या घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो गुरूवारी (ता.26) रोजी सकाळी आढळून आला. त्याला बेशुुध्द अवस्थेत रवि दंडे याने उपचारार्थ घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र एकनाथ शेजुळ याने आत्महत्या केली की, त्याचा कोणी घातपात केला. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस रेखा चांदे करीत आहे.