
वाळूजमहानगर, (ता.19) – बजाजनगर येथील श्रीनाथ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक मनोज गंगाधर डमाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे औषध निर्माणशास्त्र (फार्मसी) या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.
प्रा. डमाळे यांनी औषधी रसायनशास्त्र या विषयावर संशोधन कार्य केले. त्यांना यशवंतराव चव्हाण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयIचे डॉ. जयप्रकाश संगशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक डमाळे हे राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र संस्था, कोलकत्ताचे माजी विद्यार्थी आहेत. प्राचार्य डॉ. मराठे, डॉ. वक्ते, प्राचार्य डॉ. मौर्या, डॉ. अबू बखर आणि प्राचार्य डॉ. शेळके यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव व सहसचिव अमन जाधव यांनी प्राध्यापक डमाळे यांचे अभिनंदन केले.
