
वाळुज महानगर, (त.9) – ‘सुसंवाद-जागर भक्तीचा’ या उपक्रमा अंतर्गत गंगापूर तालुक्यातील अनेक संत एकत्रित येऊन प्रत्येक एकादशीला सकाळी गाव खेड्यात जाऊन नगरप्रदक्षिणा व गावकऱ्यांना कुटुंब प्रबोधन, मातृशक्तीचा जागर, व्यसनमुक्ती, समरसता, बाल संस्कार, गोसेवा, सण-उत्सव, विविध महापुरुषांची जयंती, ग्राम स्वच्छता. अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करत आहे. 
हा अनोखा व धार्मिक उपक्रम गंगापूर तालुक्यात राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत चौथ्या एकादशीनिमित्त शनिवारी (ता.7 जून) रोजी तुर्काबाद परिसरातील रामनगर (अब्दलपुर), कदीम शहापूर, गंगापूर परिसरातील शिवापुर (नवाबपूरवाडी) व वडळी येथे अनेक संत व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुसंवाद जागर भक्तीचा हा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.
प्रत्येक गावात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांची आपल्या गावात या उपक्रमाची मागणी होत आहे.
