March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.2) – वाळूज येथील शिवाजीनगर परिसरातील कलानगर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाला शुक्रवारी (ता.1) रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

प्रथम आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भगवान पाटील यांच्या हस्ते सपत्नीक कलश पूजन करण्यात येऊन उपस्थित त्रिमूर्ती बिल्डरचे अण्णासाहेब जाधव, भाजपाचे बाबासाहेब शिंदे, अशोक हिवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राम कदम पाटील, चेअरमन जनार्दन चनघटे आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन, श्री गजानन महाराज प्रतिमा पूजन व महाआरती होऊन विजय ग्रंथ पारायणला सुरुवात झाली.

यावेळी ह भ प वाल्मिक महाराज सावंत राजुरा यांच्यासह महिला भाविकांनी विजय ग्रंथाचे वाचन केले.

त्यानंतर गाथा भजन, हरिपाठ, हरी किर्तन व त्यानंतर रात्री 8 ते 10 या वेळेत ह भ प सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे यांचे कीर्तन झाले.

 

रविवारी (ता.3) रोजी सकाळी 8 ते 10 नगरप्रदक्षिणा त्यानंतर 10 ते 12 या वेळेत हभप दादा महाराज वायसळ यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *