February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.30) – तु माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली? असे म्हणुन शिवीगाळ करुन संभाजी वीर नावाच्या एका (हॉटेलमध्ये कुक) ने हॉटेल मालकाच्या अंगावर चाकु घेवुन धावुन आला. ही घटना गुरुवारी (ता.29) रोजी भल्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील हॉटेल मोरया येथे घडली.

बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील गणेश बीरंगळ याचे महाराणा प्रताप चौक, बजाजनगर हाँटेल मोरया बार ॲन्ड रेस्टॉरंट अॅन्ड लॉज आहे. गुरुवारी (ता.29) रोजी भल्या पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास गणेश बिरंगल हा हॉटेल मोरया लॉजवर असतांना संभाजी वीर व स्वप्नील गालफाडे असे लॉजवर आले. व म्हणाले की, आम्हाला दारु पाहीजे, हाँटेल व बार बंद केले आहे, तुम्हाला दारु मिळणार नाही. असे त्यांना सांगितले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हाँटेलच्या नामफलकावर व शटरवर दगड फेक करुन नुकसान केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गणेश बिरंगळने तक्रार दिल्याने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा मनात राग धरुन आरोपी संभाजी वीर हा गुरुवारी (ता.29) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास पुन्हा त्याच हॉटेलवर आला. व तु माझ्या विरुद्ध तक्रार का दिली. असे म्हणुन शिवीगाळ करुन गणेश बिरंगडच्या अंगावर चाकु घेवुन धावुन आला. यावेळी हॉटेल मधील स्टाफ व बिरंगळ यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याचे नाव गाव विचारले असता संभाजी अहिलाजी विर, वय-32 वर्षे, धंदा-कुक, रा.छत्रपतीनगर, वडगाव कोल्हाटी. असे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी एक धारदार चाकू जप्त केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *