वाळूज महानगर – गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असतानाही मध्येच वाहने थांबून गप्पा मारणाऱ्याला पोलिसांनी मज्जाव केल्याने आरोपीने तू मला ओळखत नाही का?,
मी उपसरपंच आहे, तुला काय करायचे ते कर. असे म्हणत शिवीगाळ करत एका पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार वाळूज पोलीस ठाण्याजवळ वाळूज शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.
वाळूज महामार्गावर दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्याने वाळूज पोलिस ठाण्याचे पोलीस काँस्टेबल पांडूरंग गबाळे हे शनिवारी (ता.22) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वाहतुक व्यवस्था सुरळीत करीत होते.
त्याचवेळी वाळूजच्या कमळापूर फाट्यावर कारचालक बबलु पठाण हे रस्त्यावर सय्यद समीर (रा.लिंबेजळगाव) याच्याशी बोलत असतांना वाहतुकीची कोंडी झाली. पोकॉ. गबाळे यांनी कारचालक बबलु पठाणला कार काढण्यास सांगितले. यावेळी कारचालका बबलू पठाणसोबत गप्पा मारणार्या समीर सय्यद याने पोकॉ.गबाळे यांच्यासोबत वाद घालत. समीर सय्यद याने पोकॉ.गबाळे यांना तुला काय करायचे ते कर, तु मला ओळखत नाही का?, मी लिंबेजळगावचा उपसरपंच आहे. असे म्हणत समीर सय्यद याने पोकॉ.गबाळे यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच समीर सय्यद याने पोकॉ.गबाळे यांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी समीर सय्यद याच्याविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके हे करीत आहे.