March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.13) – पप्पांना सागून मला 1 लाख रूपये मिळवून दे, अन्यथा तुला बरबाद करीन, तुझे फोटो व्हायरल करीन, तुझे लग्न होवू द्यायचे की, मोडायचे. असा मेसेज करीत सावत्र भावानेच लहाण बहिणाला धमकी दिल्याची घटना घडल्याने वाळूज परिसरात खळबळ उडाली आहे.

या बाबत माहिती अशी की, वीस वर्षीय पिडीत मुलीच्या वडीलांचे दोन लग्न झाले आहेत. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नी पासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी असे दोन आपत्य आहेत. तर, दुसऱ्या पत्नीपासून सुद्धा एक मुलगा एक, मुलगी असे दोन आपत्य आहेत. पहिल्या पत्नीपासून असणाऱ्या मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा वडील व सावत्र आई, भावंडासह न राहता स्वतंत्र राहतो. रक्षा बंधन, दिवाळी आदी सणासाठी तो सावत्र बहिणी-भावाला भेटण्यासाठी येत असत. यावेळी तो त्याच्या 20 वर्षीय सावत्र बहिणीसोबत फोटोसुद्धा काढत असत. भावासोबत फोटो काढत असल्याने तो त्या फोटोंचा दुरूपयोग करेल. असे बहिणीला वाटले नाही. परंतु 8 एप्रिल रोजी 20 वर्षिय बहिणीच्या मोबाईलवर आरोपी सावत्र भावाचा मेसेज आला. त्यामुळे पीडित मुलीने एमआयडीसी वाळूज पोलिसांत धाव घेत 27 वर्षीय भावाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *