February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.6) : – पेवर ब्लॉक व जी आय पाईपलाईन कामाचे भूमिपूजन जोगेश्वरी ग्रामपंचायत चे माजी सरपंच अमोल लोहकरे व विद्यमान सरपंच गजानन कारभारी बोंबले यांच्या हस्ते सोमवारी (ता.5) रोजी करण्यात आले.

नायगाव बकवाल नगर येथील नागरिकांची दखल घेऊन अमोल लोहकरे यांनी मौजे नायगाव येथील बुद्ध विहार येथे पेवर ब्लॉक कामाचे भूमिपूजन केले. तसेच बकवालनगर, शांतीनगर येथे सरपंच गजानन कारभारी बोंबले यांचे हस्ते जी.आय. पाईपलाईन कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच प्रवीण दुबिले, ग्रामपंचायत सदस्य योगेश दळवी, रमेश आरगडे, प्रवीण थोरात, गणेश ठोकळ, किशोर बिलवाल, सुरेश वाघमारे, मोईस शेख, अनिल वाघ, गणेश साबळे, नजीरखा पठाण, पंडित पनाड, विलास सौदागर, कृष्णा काजळे, प्रभाकर सूर्यभान काजळे, तसेच ग्रामस्थ शंकर राठोड, रुस्तुम सिरसाट, अश्रू मस्के, बाबासाहेब पगारे व ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश थोरात, मनोर लोकरे, पुषराज करपे, अशपाक बेग उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *