February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.22) – वाळूज परिसरातील पिंपरखेडा मेहंदीपुर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे नारायण चनघटे पाटील व भारतीय जनता पार्टीचे नंदकुमार गांधीले पाटील यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होऊन महाविकास आघाडीने भाजपाला पराभूत करून ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला.

पिंपरखेडा मेहंदीपुर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण पुरुषांसाठी आहे. येथे भारतीय जनता पार्टीचे नंदकुमार गांधीले पाटील यांचे शिवशाही ग्रामविकास पॅनल व महाविकास आघाडीचे नारायण चनघटे पाटील यांचे परिवर्तन ग्रामविकास पॅनल असे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. या निवडणुकीत नारायण चनघटे यांनी सर्वाधिक 476 मते घेऊन सरपंच पद हस्तगत केले. तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 7 जागेसाठी दोन्ही पॅनल मध्ये झालेल्या सरळ सरळ लढतीत नारायण चनघटे यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलने 4 जागा पटकावल्या. तर गांधीले पाटील यांच्या शिवशाही ग्रामविकास पॅनलला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.
येथे महाविकास आघाडीचे नारायण चनघटे यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे नारायण चनघटे सरपंचपदी तर ग्रामपंचायत सदस्यांमधून सविता संदीप चनघटे, सुमन बद्रीनाथ चनघटे, ज्योती संदीप गोरे व सुमनताई सुदामराव खजिनदार हे विजयी झाले. तसेच भारतीय जनता पार्टीचे नंदकुमार गांधिले पाटील यांच्या शिवशाही ग्रामविकास पॅनलचे कांता दत्तात्रय शिंदे, चांदबी राजू शेख व भरत शांतीलाल चनघटे हे विजयी झाले. ग्रामपंचायतचा निकाल हाती येताच पिंपरखेडा येथे महाविकास आघाडीच्या वतीने गुलालाची उधळण करत जल्लोष करून मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *