February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.1) – मराठा समाजाच्या मागणीसाठी सर्वत्र मोर्चे, आंदोलने तसेच आमरण व साखळी उपोषणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाळूज परिसरातील पाटोदा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.31) रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या विविध घोषणांनी संपूर्ण पाटोदा गाव दणाणले होते.


मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. लोकशाही मार्गाने शांततेत सुरू असलेल्या या उपोषणाचा सातवा दिवस उलटूनही सरकार दखल घेत नाही.

त्यामुळे मराठा समाजाचा संयम सुटत चालला आहे. परिणामी लोक आता रस्त्यावर उतरत आहे. मनोज पाटील जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून वाळूज परिसरातील पाटोदा येथे मंगळवारी (ता.31) रोजी रात्री भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला.

या कॅन्डल मार्चसाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते. हनुमान मंदिरापासून सुरू झालेला हा कॅन्डल मार्च संपूर्ण गावातून फेरी मारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेला. तेथे या कॅन्डल मार्चची सांगता झाली. या कॅन्डल मार्च दरम्यानदे ण्यात आलेल्या एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, जय भवानी जय शिवराय, शिवाजी महाराज की जय. अशा विविध घोषणांनी संपूर्ण पाटोदा गाव दणाणले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *