
वाळूज महानगर, ता.3) – चोरीच्या दुचाकी विक्री करण्यास येणाऱ्या चार चोरट्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातील 3 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई रविवारी (ता.1) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास वाळुज परिसरातील तिसगाव येथे करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी काही चोरटे तीसगाव चौफुली पुलाजवळ येणार असल्याचे पोलिसांना समजताच तेथे सापळा लावला असता रविवारी (ता.1) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार इसम आले. तेच आरोपी असल्याची खात्री होताच पोलीसांनी त्यांना ताध्यात घेवून चौकशी असता त्यांचे नावा सुनिल संजय महेर वय 20 वर्ष रा. चिकलठाणा, राहुल छोटु लोखंडे वय 20 वर्ष रा. बजाजनगर, दिपक राजु बताडे वय 25 वर्ष रा. शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर व विष्णु ज्ञानेश्वर सोनवणे वय 20 वर्ष रा. छत्रपतीनगर वडगाव (को.) असे असल्याचे समजले. त्यांच्या ताब्यातील दोन्ही दुचाकीचे कागदपत नसल्याचे सांगीतले. तसेच इंजिन नंबर व चेसीस नंबरवरून खात्री केली असता काळ्या रंगाच्या 220 पल्सरचा क्रमांक एम एच 20, डी वाय- 4137 असा असुन मालक प्रशांत विलास राठोड असल्याचे दिसुन आले. तसेच काळ्या रंगाची पेंशन प्रो.चा क्रमांक एम एच 20, ई एन- 4613 असा असुन मालक सुरेश सुखदेव सोनवणे असे दिसुन आले. यावरून या दुचाकी यांनी चोरल्याची खात्री झाली. आरोपीकडे विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी एकुण 5 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली, त्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. यात 1 लाख 30 हजार रुपये किमतीची बजाज 220 काळ्या रंगाची व विना क्रमांकाची, 60 हजार रुपये किमतीची होन्डा कंपनीची काळ्या रंगाची व विना क्रमांकाची पेंशन प्रो, 60 हजार रुपये किमतीची होन्डा कंपनीची विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची, 55 हजार रुपये किमतीची एच. एफ. डिलक्स कंपनीची बिना क्रमांकाची काळ्या रंगाची व श 50 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची ग्लॅमर कंपनीची विना क्रमांकाची लाल काळ्या रंगाची. अशा 5 दुचाकी 3 लाख 60 हजार रुपये किमतीच्या आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नित्तिन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त आशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पो. नि. गणेश ताटे, सपोनि गौत्तम बावळे, पोउपनि दिपक रोटे, धिरजलाल कालिये, सुरज भिसे, नितीन इनामे, सुरज अग्रवाल, यशवंत गोबाडे, हनुमान ठोके, सुरेश कचे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली.
