March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – पती बेपत्ता झाल्याने त्याचा शोध घ्यावा या मागणीची तक्रार विवाहितेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना 14 एप्रिल रोजी रांजणगाव शेणखुंडी येथे घडली.


कृष्णा सुर्यभान ताठे (23) रा. कमळापूर फाटा, रांजणगाव हे 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मोबाईल रिपेअर करण्यासाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत कृष्णा ताठे हे घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी प्रिती ताठे यांनी नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र पती कृष्णा ताठे हे कुठेही मिळून न आल्याने प्रिती ताठे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *