वाळूजमहानगर, ता.13 – माझी पत्नी नांदावयास येण्यासाठी तयार आहे. मात्र तू आणि तुझी पत्नी तिला नांदावयास का? येऊ देत नाही. असे म्हणून नातेवाईकांनी पती-पत्नीवर हल्ला करुन रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना रवीवारी (ता.10) रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास वडगाव lरामपुरी) येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रवी उषा भोसले ( रा. आंबेलोहळ) हे पत्नी कुलवंता हे भाऊबीजेच्या सणासाठी वडगाव (रामपुरी) येथे मेव्हणा सखाराम फत्रु चव्हाण याच्या घरी आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर दोघे पती-पत्नी मेव्हणा सखाराम चव्हाण यांच्या घरासमोर झोपले होते. रवीवारी (ता.10) रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास रवी भोसले याचे नातेवाईक किशोर कडू काळे, बदाम कडु काळे, तिरंगा कडु काळे (सर्व रा.शिरुडी, ता.गंगापूर) व उमेश नंदन काळे (रा.पांढरीपुल घोसपुरी, जि. अहिल्यानगर) हे सखाराम चव्हाण याच्या घरी आले. यावेळी घराबाहेर झोपलेल्या रवी भोसले यास त्याचा साडु किशोर काळे याने माझी पत्नी नांदावयास तयार असतांना तु व तुझी पत्नी तिला नांदविण्यासाठी का पाठवित नाही? या कारणावरुन कुऱ्हाड, लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी रवी भोसले याची पत्नी कुलवंता ही पतीच्या मदतीसाठी आली असता तिलाही लाकडी दांड्याने हाता-पायावर मारुन जखमी करून आरोपींनी कुलवंता हिच्या हातातील 5 हजार रुपये किमंतीची चांदीची पाटली, 10 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिस्कावून घेतले. या भांडणाचा आवाज ऐकुण सखाराम चव्हाण हा मदतीसाठी आला असता आरोपींनी त्याच्या घरातील रोख 17 हजार रुपये व सखाराम याची पत्नी जयश्री चव्हाण हिचे 15 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे सेव्हन पीस असे एकुण 47 हजाराचा ऐवज हिस्कावून पसार झाले. या प्रकरणी चार जणाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.