March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.12) – घर बंद असल्याचे हेरून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आतील कपाटात ठेवलेले सुमारे 62 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. ही चोरीची घटना मंगळवारी (ता.11) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथील सलामपुरेनगरात कुटुंबासह राहणारे जनार्दन लक्ष्मण मोरे (वय 64) हे शेती व्यवसाय करतात. शनिवारी (ता.8) रोजी त्यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने जनार्धन मोरे हे घर बंद करून निपाणी नामगाव ता. नेवासा येथे गेले होते. मंगळवारी (ता.11) रोजी सकाळी 5 वाजता शेजारी राहणाऱ्या विजय माला शेळके यांनी मोरे यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मोरे यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. आणि सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरातील दागदागिने व किमती सामानाची पाहणी केली असता 60 हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे गठण, 1 हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन छोटे ग्लास, 400 रुपये किमतीचा चांदीचा देवीचा शिक्का, 300 रुपये किमतीचे चांदीचे एक फुलपात्र. असा एकूण 61 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी जनार्धन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी करीत आहे.


पाळत ठेवून घरफोडी केल्याची शंका-
जनार्दन मोरे हे सलग चार दिवस बाहेरगावी असल्याने त्यांचे घर बंद होते. बंद असलेले घर हेरून अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवली. आणि संधी मिळताच घराचा कधी कोंडा तोडून आतील किमती ऐवज लंपास केला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रात्रीची गस्त घालण्याची मागणी –
या चोरीच्या घटनेनंतर वाळुज महानगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी केली जात आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *