March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.5) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित शाखासंपर्क अभियानांतर्गत पंढरपूर, बजाजनगर-वडगांव कोल्हाटी या गटांमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन मंगळवारी (ता.4) रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किशनचंद तनवाणी यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना येणार्या काळात आपल्याच पक्षाचा सुवर्णकाळ येणार असून त्यासाठी शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्यापर्यंतच्या सर्व पदाधिकार्यांनी संघटना वाढीसह सातत्त्याने नागरिकांच्या संपर्कात राहून लोकहिताची कामे करण्यावर भर द्यावा. असे मार्गदर्शनपर आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले. तालुक्यातील सर्व शाखाप्रमुखांना कशाप्रकारे संघटनात्मक कार्य करून पक्ष वाढविण्यासह शाखेतल्या सर्व पदाधिकार्यांना सोबत घेत संघटना जास्तीत जास्त मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही गायकवाड म्हणाले.

यावेळी माझी पंचायत समिती सदस्य गणेश नवले, शहरप्रमुख सागर शिंदे, उपतालुकाप्रमुख सुभाष साबळे, माजी सरपंच सचिन गरड, उद्योजक कैलास भोकरे, कृष्णा राठोड, माजी जि.प. सदस्य अरविंद धीवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे, किशोर खांडरे, बिबन सय्यद, विश्वास येवले, ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे, विभाग प्रमुख सतीश हिवाळे, रोहित चव्हाण, संतोष चंदन, गणेश सुर्यवंशी, लखन सलामपुरे, सुरेश जगताप, उपविभाग प्रमुख पितांबर शिंदे, अमोल पोटे, शाखाप्रमुख अमोल पोटे, वसंत अहिरे, शाहूराज पाटील, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर गोल्हार, बाळासाहेब शिंदे, सिद्धार्थ नरसाळे, गजानन मिरगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *