March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.12) – पंढरपूर येथे श्री महादेव गोमुख कुंड मंदिराच्या वतीने तिसऱ्या श्रावण सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी भव्य कावड यात्रा काढण्यात आली.

या कावड यात्रेचा शुभारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून करण्यात आला. ही कावड यात्रा पंढरपुरातील मुख्य रस्त्यावरून मंदिरापर्यंत काढण्यात आली. कावड यात्रेदरम्यान वळदगाव येथील कल्याणराव झळके यांच्याकडून सर्व भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

श्री महादेव गोमुख कुंड मंदिर कावड यात्रेच्या यशस्वितेसाठी शरद लोहकरे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी परिश्रम घेतले. कावड यात्रेत हर्षद शिरसाट, वडगाव बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *