
वाळुज महानगर, (ता.20) – पंढरपूर येथील श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या सभागृहात कामिका एकादशी निमित्त सोमवार 21 जुलै रोजी भव्य किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आळंदी देवाची येथील बाल कीर्तनकार ह.भ. प. ज्ञानेश पुत्र चैतन्य महाराज राऊत यांचे हरि कीर्तन सकाळी 11 ते 1 पर्यंत होणार असून पहाटे श्री विट्ठल रुक्मिणी मूर्तीस संस्थानचे सचिव आप्पासाहेब झळके यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक आणि संतपूजन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या तर्फे उपस्थित सर्व भाविकांना साबूदाना खिचडीचे वाटप करण्यात येईल. या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर च्या वतीने करण्यात आले आहे.
