
वाळूजमहानगर – एका चिकण व्यवसायकास व त्याच्या भावास अनोळखी चोघांनी शिवीगाळ करून फायटर मारून जखमी केले. ही घटना पंढरपुर येथे सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हाशीम वजीर बेग हा गणेश कॉलनी पंढरपुर येथे आईवडील व भाऊ कासीम वजीर बेग यांच्या सोबत राहत असून ते चिकनचा व्यवसाय करतात. सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी दोघे भाऊ घरी असतांना घराबाहेर आराडा ओरड सुरु असल्याने हाशीम हा घरा बाहेर गेला. त्यावेळी चार अनोळखी इसम आपसात भांडण करत होते. त्यावेळी हशीम याने येथे आरडाओरड करून का. असे म्हणताच त्यांनी शिवीगाळ करून हाताचापटाने व फायटर डोक्यात मारून जखमी केले. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने भाऊ कसीम हा तेथे येऊन त्यांचे भांडणे सोडवित असताना त्याच्याही डोक्यात फायटर मारून जखमी केले. त्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले. या प्रकरणी एमआयडीसी
वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
