March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.23) – सर्वजण रात्रीचे काढ झोपेत असताना 25 वर्षीय विवाहित महिला घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तुर्काबाद येथे उघडकीस आली.

तुर्काबाद (खराडी) येथील मंगलबाई बद्री मेटे वय 25 ही विवाहित महिला घरातील कुटुंबासह झोपलेली असताना ती घरात कोणास काही एक न सांगता 16 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कोठेतरी निघुन गेली आहे. पुंजाराम मेटे वय 38 वर्ष धंदा शेती रा. तुर्काबाद ता. गंगापूर यांनी दिलेल्या खबरी वरून वाळूज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण बुट्टे करीत आहे. रंग गोरा, उंची 4 फूट पाच इंच, अंगात चॉकलेटी रंगाची साडी व ब्लाऊज, शरिरबांधा मजबूत, उजव्या हातावर MB असे गोंदलेले, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात सोन्याची पोत, पायात राखाडी रंगाची चप्पल,मराठी भाषा बोलते. असे तिचे वर्णन आहे. या महिले बाबत काही माहीती मिळाल्यास वाळूज पोलीस ठाण्याची संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *