“वाळूज महानगर परिसरामधून हजारो डॉक्टर्स व इंजिनिअर्स घडविणारी एकमेव अकॅडमी” असे ब्रीद घेऊन इ.11 वी 12 वीसह मेडीकल, इंजिनिअरीग प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या सरस्वती एज्युकेशनल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मेडीकल पात्रता व प्रवेश परीक्षा 2022 (नीट) मध्ये घवघवीत यश संपादन केले.

या परीक्षेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण संपादन करून यशाला गवसणी घातली आहे. यामध्ये श्रुती जाधव (630), स्वप्नील चौरे (615), प्रज्ञा आंधळे (594), माधवी पवार (590), आकांक्षा राठोड (576), निकीता वानरे (512) पूजा केंद्रे (490), प्रतीक झा (480), कोमल चव्हाण (449), पूनम घाडगे (449), नेहा बसाळगे (446) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व यशवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे सरस्वती एज्युकेशनल अकॅडमीच्या वतीने संचालक प्रा. सुनील पाडळकर तसेच अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी स्वागत केले. या परीक्षेतील यशाकरीता विद्यार्थ्यांच्या जिद्दीसोबत अकॅडमीच्या शिक्षकांनी कठोर परीश्रम घेऊन विद्यार्थ्यांकडून या परीक्षेसाठी आवश्यक त्या सर्व सूक्ष्म-अतिसूक्ष्म बाबींची तयारी करून घेतल्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.