वाळूज महानगर, (ता.5) – घरात एकटी असलेल्या महिलेस गावातीलच 25 वर्षीय तरुणाने पाठीमागून जाऊन मिठी मारत तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ही घटना वाळूज परिसरातील नारायणपूर येथे बुधवारी (ता.4) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, नारायणपूर येथील फिर्यादी महिला घरी एकटी असताना तीला आरोपी कृष्णा बनकर, (25) रा.नारायणपुर ता. गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने वाईट हेतूने मिठीत पकडुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले. तसेच हा प्रकार कोणास सांगितला तर बघून घेईल. अशी धमकी दिली.
बुधवारी (ता.4) रोजी दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेप्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा बनकर यांच्या विरुद्ध कलम 354, 354 (अ), 506 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.