वाळूजमहानगर, (ता.18) – दुध घेऊन येत असतांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी (ता.17) रोजी ए एस क्लब चौक लगत घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, 65 वर्षीय वृद्ध महिला मीना कासलीवाल या सिडको वाळूज महानगर येथील कासलीवाल फ्लोरा, ए एस क्लब समोर येथे मुली सोबत राहतात. शुक्रवारी (ता.17( रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघी मायलेकी दूध घेऊन पायी येत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून अंदाजे 30 ते 35 वयोगटाचे दोघे आले. त्यातील समोरच्याने डोक्यात हेल्मेट व पाठीमागे बसलेल्याने तोडला रूमाला बंधालेला. त्यांनी मिना खंडेलवाल यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून धुम ठोकली. त्यानंतर मिना यांनी आराडा ओरड केली. मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते. घटनेनंतर मीना खंडेलवाल यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. प्रविण पाथरकर हे करीत आहे.