March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.5) – वडगाव कोल्हाटी येथील घरासमोर उभी केलेली 90 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (ता.4) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल राजेंद्र वाघ (24) रा. वडगाव कोल्हाटी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या मालकीची व 90 हजार रुपये किमतीची (एम एच 18, बीपी -7277) होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी राहते घरासमोर हँडल लॉक करून उभी केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने बुधवारी (ता.4) रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान चोरी करून घेऊन गेला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा द वी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *