
वाळूज महानगर, (ता.18) – हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या युवका विरूध्द गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी वाळुज एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी कमेंट त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सोमवारी (ता.17) रोजी दुपारी टाकली होती. ही कमेंट काही तरूणांनी बघितल्यावर संबंधित प्रकाराबाबत वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरूणाला अटक करावी व त्याच्याविरूध्द धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी बजरंग दल वाळूज प्रखंड संयोजक सुमित अनिलकुमार चोरडिया, जिल्हा संयोजक हर्षवर्धन केणेकर, महाराणा प्रखंड संयोजक संदिप गायके, सुंदर वायाळ, अमोल धनवटे, राहुल काजळे, सुरज सोळंके, दिनेश पाटील, शरद पवार, करण सतोलकर, नागेश झाकने,अनिकेत थोरात,अविनाश थोरात, गोविंद पाटील, सुरज पाटील, ऋषभ यादव, धीरज साकल, आशिष ल्यागलवाड, राहुल रेडी, मयूर पाटील, शुभम बाबीलवाड, मयूर दुसाने, रवी कदम, धीरज साखल, मोनू भंडारी आदींनी केली आहे.
