February 5, 2026

वाळूजमहानगर – तू माझ्या विरोधात इंस्टाग्रामवर स्टोरी का लावतो. असा जाब विचारत धारदार वस्तूने मानेवर वार करून जखमी केले. तसेच मध्यस्थी करणाऱ्यावर सुद्धा वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी 4 डिसेंबर रोजी रात्री 6:30 वाजेच्या सुमारास रांजणगाव येथे घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बंजारा कॉलनी, रांजणगाव (शेणपुंजी) येथील निखील संतोष राठोड (वय 17) हा शाहू महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकतो. गुरूवारी 4 डिसेंबर रोजी सांयकाळी 6:30 वाजेच्या सुमारास निखील व त्याचा मित्र आदित्य मारुती काकडे हे दोघे भुंजगवस्ती येथील मित्र आदित्य कुकडे यास फिजिक्सचे पुस्तक देण्यासाठी जात होते. दरम्यान त्यांना कमळापूर रस्त्यावरील नुराणी मज्जिदजवळ त्यांचा मित्र ओम मनिष नागपुरे हा भेटला. निखील याने माझ्या विरूद्ध इस्टाग्रामवर स्टोरी का लावतो ? याबाबद मनिष याच्याकडे विचारपुरस केली. व काही वाद असेल तर आपण मिटवून घेऊ, तु माझ्या विरूद्ध स्टोरी लावू नको असे म्हणाला. त्यावेळी मनिष नागपुरे याने निखील यास शिवीगाळ करून हाताचापाटाने मारहाण करीत त्याच्या मानेवर डाव्या बाजूने धारदार वस्तूने वार करून जखमी केले. यावेळी आदित्य काकडे हा मध्यस्थी करण्यासाठी पडला असता त्याला सुद्धा धारदार वस्तूने वार करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या राठोड व काकडे यांना ओमकार तिवारी, पवन गायकावाड यानी तात्काळ बजाजनगरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. दोघावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून निखिल राठोड याला 23 टाके पडले आहे. तर आदित्य काकडे यांना 26 टाके पडले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *