
वाळूज महानगर, (ता.7) – वाळूज महानगरातील तुर्काबाद (खराडी) तालुका गंगापूर येथील धर्माचार्य हभप डॉ जनार्दन महाराज मेटे यांची अखिल भारतीय साधू संत समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंघटनमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भिवंडी मुंबई येथे शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात अ. भा. संत समितीचे केंद्रीय महामंत्री महामंडलेश्वर पू. जितेंद्र आनंदजी महाराज वाराणसी व संत समिती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पू. भारतानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते डॉ. मेटे महाराज यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज, नानिज धाम, श्री क्षेत्र कौडन्यपुर येथील महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांच्यासह भारतातील विविध पंथ संप्रदायातील महंत, साधू, संन्याशी महामंडलेश्वर, विविध आखाड्यातील साधू, संत मंडळींची उपस्थिती होती.
