March 17, 2026


वाळूजमहानगर, (ता.1) – एन-5, सिडको (दक्षिण), औरंगाबाद येथील धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मंगळवारी (ता.21) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून आपल्या स्वयंपाक घरातील आयुर्वेदिक औषधी त्यांचा आपल्याला होणारा उपयोग स्पष्ट केला. त्याचप्रमाणे आपल्या आहारात भाजीपाला फळे यांचे महत्त्व स्पष्ट केले. परिसर अभ्यासातील विविध वैज्ञानिक प्रयोगही विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका खोतकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य आपल्या जीवनात अखंड अविरत अंगिकारावे. अशा आशयाचे भाषण केले. प्रमुख वक्त्या श्रीमती साबळे मॅडम यांनी याप्रसंगी सी व्ही रमण यांच्या जीवनातील काही घटना कथात्मक सांगून त्यांचा बालपणापासूनचा वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यातूनच त्यांनी केलेले रमण इफेक्ट सारख्या प्रयोगाची माहिती दिली. श्रीमती देशपांडे मॅडम यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *