
वाळूजमहानगर, (ता.16) – दोन चिमुकल्या लेकरांना घेऊन एक 28 वर्षीय विवाहित महिला कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेली. ही घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ऋषिकेशनगरात गुरुवारी (ता.14) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उदय बालूराव सपकाळ (48) हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीत काम करतात. ते कुटुंबासह रांजणगाव (शेणपुंजी) येथील ऋषिकेशनगरात राहतात. गुरुवारी (ता.14) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी प्रीती उदय सपकाळ (वय 28) ही निवादिता (वय 11 वर्षे), परिक्षीत (वय 6 वर्षे) या दोन लेकरांना घेवुन राहत्या घरातुन कोणास काहीएक न सांगता निघुन गेली. ती अद्यापही परत नाही. म्हणुन तिचा नातेवाईकाकडे, रेल्वे स्टेशन, बसस्टैंड आदी ठिकाणी शोध घेतला. परंतु ती मिळुन आला नाही. 
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून त्यांचा शोध पोलीस हवालदार आर. एस. तांदळे घेत आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे –
नाव – प्रीती उदय सपकाळ, वय 28 वर्षे, उंची 6 फुट, रंग- गोरा, चेहरा लांबट, नाक- सरळ, वेषभुषा – पिवळट फिकट रंगाची साडी, भाषा – मराठी.
सोबत दोन मुले नामे 1 ) निवादिता वय 11 वर्षे व परिक्षीत वय 6 वर्षे. याबाबत कोणास काहीही माहिती मिळाल्यास वाळूज एमआयडीसी पोलीस अंशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
