
वाळूज महानगर – एकाच दिशेने जाणाऱ्या दोन दुचाकी एकमेकींना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीवरील पती पत्नी व त्यांची मुले असे एकूण 6 जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी 19 जुलै रोजी सकाळी इसारवाडी फाट्यावर झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की तेलंगणा राज्यातील दुचाकी (टी एस 19, डब्ल्यू जे – 3710) व अन्य एक पल्सर दुचाकी अशा दोन वेगवेगळ्या दुचाकीवर दोन जण पत्नी व मुलांसह एकाच दिशेने जात होते. 
या दोन्हीही दुचाकी छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर येतात त्या एकमेकींना धडकल्या. 
शनिवारी 19 जुलै रोजी सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन्ही दुचाकीवरील शिल्लंम मरियम्मा (वय 30), परुई मल्लू (वय 35) असे 6 जण जखमी झाले. जखमी मध्ये दोन बालकांचा समावेश आहे. 
या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्रींच्या नाणिजधाम जिल्हा रत्नागिरी येथील विनामूल्य रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.
