March 18, 2026

वाळुज महानगर, (ता.12) – तुर्काबादकडून डोमेगावकडे व डोमेगावकडून तुर्काबादकडे भरधाव येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीवरील 4 जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी (ता.11) रोजी दुपारी तुर्काबाद मलकापूर डोमेगाव रस्त्यावरून झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद येथील सख्खे मावत भाऊ असलेले सुमित आप्पासाहेब आव्हाड (वय 17) व आकाश मच्छिंद्र साठे (26) हे दोघे दुचाकी (एम एच 20, एफ डी -8491) वरून मलकापूर कडे लग्नाला जात होते. तर डोमेगाव येथील मुस्ताक मुनिर शाह (19) व अली मुबारक शहा दुचाकी (एम एच 20, एफ एम-8020) वरून तुर्काबादकडे येत होते.

या दोन्ही दुचाकी शुक्रवारी (ता.11) रोजी तुर्काबाद मलकापूर शिरोडी रस्त्यावरून भरधाव जात होत्या. दोन्हीही दुचाकी अत्यंत जोरात असल्याने चालकाचा दुचाकीवरील ताबा सोडून त्या समोरासमोर एकमेकींना धडकल्या. ऐन दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात ती गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना त्वरित ईसारवाडी फाटा येथील नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी दवाखान्यात हलवले. तेथे उपचार सुरू असताना रात्री दोघांचा तर सकाळी एकाचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनि. रमेश राठोड, सफौ दशरथ खोसरे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

  मयत व जखमीची नावे अशी –
या भीषण अपघातात आकाश मच्छिंद्र साठे (वय 26) वर्षे रा. तुर्काबाद (खराडी), सुमित आप्पासाहेब आव्हाड (वय 17) रा.तुर्काबाद (खराडी) व मुस्ताक मुनीर शहा (वय 19) रा. डोमेगाव हे तीन मयत झाले आहे. तर अली मुबारक शहा रा. तुर्काबाद (खराडी) याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *