February 5, 2026

वाळुजमहानगर (ता.4) – रोहित्र बसवण्याचे काम सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट झाल्याने विद्युत पोलवरील दोघांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात एक जण गंभीर जखमी होऊन उलटा लटकला. तर एक किरकोळ जखमी झाला. ही घटना बुधवारी 3 डिसेंबर रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथे घडली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगरातील भुखंड क्र एक्स-158 समोर नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात येत आहे. हे काम पाँलीकँब या खासगी एजन्सीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. बुधवारी 3 डिसेंबर रोजी रोहित्रावरील लोखंडी पोलवर देविदास मोकळे ( वय 47) व प्रकाश तुपे ( वय 43) हे दोघे पोलवर व इतर कामगार खाली काम करीत होते. दुपारी 3:15 वाजेच्या अचानक या ट्रान्सफार्मरवर शार्टसर्किट होऊन दोघांना विजेचा शाँक बसला.

या घटनेत मोकळे हा गंभीर जखमी होऊन लोखंडी पोलवर उलटा लटकला. तर तुपे याने घट्ट पकडून धरल्याने तो किरकोळ जखमी झाला मात्र सुदैवाने थोडक्यात बचावला. यावेळी स्फोट झाल्यासारख्या आवाजाने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान जखमीना बजाजनगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

                   कारची पोलला धडक –
हे काम सुरू असताना बजाजनगर येथील जयभवानी चौकाजवळील एका विद्युत पोलला कार (एम एच 57,-1128) ने जोरात धडक दिली. या अपघातात चालक किरकोळ जखमी होऊन कारसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताच्या जोरदार धक्क्याने फिडरला विद्युत तारेचा स्पर्श झाला. यामुळे स्पार्किंग होऊन ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *