
वाळुज महानगर, (ता.25) -भरधाव जाणारी दुचाकी व पादचारी यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह पादचारी असे दोन जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता.25) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वाळुज जवळील नवनिर्माण ढाब्यासमोर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,
निसार शेख वय 28 हा दुचाकी (एमएच 20, डी सी-2435) स्वार लिंबेजळगांववरून शेणपुंजी रांजणगावकडे जात असताना टोल नाक्याजवळील नवनिर्माण ढाब्या समोर दुचाकीस्वार आणि पायी असणारे सुहास रोहिदास काळे वय 18 यांच्यात जोरदार धडक झाली. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील लिंबे जळगाव टोल नाक्याजवळ सोमवारी (ता.25) रोजी सायंकाळी 7: 30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात निसार शेख गंभीर जखमी झाले तर सुहास काळे किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच लिंबे जळगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य ॲम्बुलन्सचे चालक संदीप त्रिंबके यांनी अपघातस्थळी हजर होऊन अपघात ग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले
