March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.19) – दोन दुचाकींची धडक झाल्याने दोघांमध्ये वाद होऊन प्रकरण शिगेला गेले. त्यामुळे तिघांनी मिळून एकाला जीवे मारण्याची धमकी देत बेदम बदडले. ही घटना शनिवारी (ता.19) रोजी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रतन बाबासाहेब घुगे (वय 30), रा. भुजंगवस्ती, यशनगर, जोगेश्वरी ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर हा शनिवारी (ता.19) रोजी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20, जी एक्स- 4039) वरुन दोन मुलांना राजा शिवाजी शाळा, बजाजनगर येथे सोडविण्यासाठी जात होता. प्रताप चौक, बजाजनगर येथे शाईन कंपनीची दुचाकी (एम एच 20, ई डब्ल्यू- 4103) रॉग साईडने येवुन घुगे याच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद वाढल्याने धडक देणाऱ्यानेच दोन मुलांना फोन वरून बोलावुन घेतले. व तिघांनी शिवीगाळ करुन हाताचापटाने व लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच तु जर तक्रार केली तर तुला जिवे मारु. अशी धमकी दिली.

याप्रकरणी रतन घुगे यांच्या फिर्यादीवरून वाळून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी चंदु कांबळे, दुचाकी (एमएच 20, ई डब्ल्यू -4103) चा चालक व इतर एक (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *