March 23, 2026

वाळुजमहानगर, (ता.8) – नियमित आरोग्य तपासणी करा. प्रत्येकाने हिमोग्लोबिन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन तपासणीचे दर अत्यंत कमी आहेत.स्वतःचे आरोग्य स्वतःच सांभाळा, आता खेड्यापाड्यातही वैद्यकीय सुविधा, काही प्रमाणात का होईना उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका. असा मोलाचा सल्ला डॉ. कानन येळीकर यांनी दिला.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त वाळूज महानगराचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील सभागृहात सोमवारी (ता.7) रोजी दुसरे अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलन व मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शासकीय रुग्णालय घाटीच्या माजी अधिष्ठाता व वाळूज जवळील सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विद्यमान अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्या हस्ते या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घघाटन झाले. याप्रसंगी येळीकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यिक, कवी व उपस्थितांना मागदर्शन केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आरोग्य जागृती असोसिएट, जय विश्वकर्मा सर्वोदय व्यसन मुक्ती केंद्र, सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, व लघाने हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त हे साहित्य संमेलन व मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात झाले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आमलतास विश्व विद्यालय (देवास मध्यप्रदेश) चे कुलगुरू डॉ.शरद्चंद्र वानखेडे होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. जी. कलवले, डॉ.सुंदर कुलकर्णी, दंत महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता डॉ.डांगे, राष्ट्रीय धर्माचार्य ह. भ. प. जनार्दन महाराज मेटे, डॉ.सुनील लघाने, साहित्यिक डॉ.छाया तातेड, विठ्ठल मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आप्पासाहेब झळके, नारायण महाराज बांबर्डे, पारसचंद साकला, शेख अख्तर, कॅन्सर मुक्ति अभियानाचे डॉ.ए.के.शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कविसंमेलन पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य कीर्तनकार डॉ. एम. डी. संकपाळ यांनी केले. पी. एस. गुजर यांनी आभार मानले. संमेलनाच्याच्या निमित्ताने जीवन गौरव, आरोग्य भूषण, आरोग्य रत्न, व आरोग्य पुरस्काराने निमंत्रीताना गौरवविण्यात आले. संमेलनात विलास चंदने, बबनराव गायकवाड, विष्णू जाधव, अनिल जाधव, प्रदीप माळी, केशव ढोले, चंद्रकांत चोरडिया, एकनाथ किर्तीकर, कल्पना वाकडे, कोकिळा देशमुख यांच्यासह अनेक साहित्यिक,कवी, व राजकीय, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व साहित्य रसिकांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *