March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – पाण्याची बॉटल घेण्यासाठी दुकानावर आलेला ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद झाल्याने ग्राहकांनी दुकानावर दगडफेक केली यात दुकानदार जखमी झाला ही घटना वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील छत्रपतीनगर येथे रविवारी (ता.21) रोजी सायंकाळी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रमोद मुरलीधर दिक्षित वय 64, रा- छत्रपतीनगर, वडगाव कोल्हाटी ता. जि. छत्रपती संभाजीनगर हा रविवारी (ता.21) रोजी दुकानात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बाजुच्या गल्लीत राहणारा बबलू उर्फ अभिजित हा पाणी नेण्यासाठी दिक्षित यांच्या दुकानावर आला होता. त्याने पाण्याची बॉटल घेतल्यानंतर पैसे देण्याच्या कारणावरुन दिक्षितसोबत वाद घातला. त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करुन तु दुकान कशी चालु ठेवतो. तेच बघुन घेतो. अशी धमकी दिली. भांडण चालु असताना तेथे बबलुचे वडील सुनिल शहाराव हे तेथे आले व त्याला घेवुन गेले. त्यानंतर अर्ध्यातासाने बबलु पुन्हा आला व शिवीगाळ करुन दुकानावर दगडफेक केली. यावेळी दगड डोक्यात लागल्याने दिक्षित हा जखमी झाला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 337, 504, 506 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *