March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.29) – स्व स्वरूप संप्रदायच्या वतीने गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाच्या वातावरणात रविवारी (ता.28) रोजी पार पडला.


मकर संक्रांत म्हटले की, सुवासिनी महिलांसाठी ही एक पर्वणीच असते. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकींना भेटून मंदिरात देवाच्या साक्षीने एकमेकींना वान वसा शुभेच्छा देऊन शुभेच्छा देतात. यावेळी पतीचे नाव उखाण्यात घेण्याची ही प्रथा आहे. त्यामुळे या सणाला आगळे वेगळे महत्त्व आहे. मकर संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत वान, वसा दिला जातो. त्याला हळदी कुंकू असे म्हणतात. याचाच एक भाग म्हणून दिवशी पिंपळगाव येथे रविवारी (ता.28) रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी संतसंग सेवा अध्यक्ष मंगलाताई मोगल यांच्या मार्गदर्शनानुसार संप्रदायाचे अष्टीगंध, अगरबत्ती पुडा वाण म्हणून वाटप करण्यात आले. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला शितलताई वावरे, रुक्मिणीताई बडोगे, मीराताई मोगल आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *