वाळूज महानगर, (ता.28) – समाजात वाढती गुन्हेगारी, महिला, मुलींची होत असलेली छेडछाड या संदर्भात शाळकरी मुलांनी व पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे, अल्पवयीन मुलांचे गैरवर्तन तसेच बालगुन्हेगारीकडे वळलेली मुले यांना कायदा व्यवस्थित समजावत तसेच भविष्यात येणारे संकट टाळण्यासाठी श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर रांजणगाव (शे. पू) येथे दामिनी पथकाद्वारे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव यांच्या हस्ते दामिनी पथकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव हरीश जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, विभागप्रमुख प्रा संजय तुपे, दामिनी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल सुभाष मानकर, महिला हेड कॉन्स्टेबल आशा गायकवाड, महिला पोलीस अमलदार अनिता खैरे, महिला पोलीस अमलदार अमृता भोपळे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू खंडागळे व सहकारी तसेच शाळेचे शिक्षक दीपक कोळी, दीपक पठारे, निलेश पाटील, पूजा गिरी, जब्बार पठाण, प्रवीण पाईकराव, छाया वागदरे, प्रल्हाद मंगनाळे आदी उपस्थित होते.