
वाळूजमहानगर, (ता.3) – एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलावर गल्लीतच राहणाऱ्या दोन नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची अत्यंत सणसणआटई घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे एक जुलै रोजी भर दुपारी घडली. यातील एका नराधमास अटक करण्यात आली असून दुसरा मात्र घरात आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मधुमालकीनगरात पीडित दहा वर्षीय अल्पवयीन मुलगा आईवडील, बहिण व भावासह राहतो. एक जुलै रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पीडित मुलगा हा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने आईने मोठ्या मुलाला पाठवून त्याला शोधून आणण्यास सांगितले. त्यामुळे तो लहान भावाला आवाज देत शोधत होता. दरम्यान आरोपी अनिकेत दनके यांच्या घराजवळून आवाज आला की, ‘दादा मला वाचव’. हा आवाज ऐकून मोठा भाऊ लहान भावाच्या आवाजाच्या दिशेने गेला असता तेथे अनिकेत याच्या घरातील बेडरूम मध्ये अनिकेत दणके हा त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. व दहा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगा ओरडत होता. त्याच्या शेजारीच आरोपी इरफान उर्फ गोल्या जफर सय्यद उभा होता. पीडित अल्पवयीन मुलाचा मोठा भाऊ तेथे येताच आरोपींनी येथे जे काही झाले, त्याबाबत कोणालाही काही सांगायचे नाही. नसता तुम्हा दोघांनाही जिवंत मारून टाकू. अशी धमकी दिली. त्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाला घरी आणले. त्याला त्रास होत असल्याने चालता येत नव्हते. त्यामुळे आईने काय झाले असे त्यांना विचारले असता त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर आईने त्याची चड्डी काढून पाहिले असता गुप्तांगातून रक्त निघत होते. शिवाय चड्डीवर रक्त व पांढरट पदार्थ दिसत होता. त्याला चालता व नीट बसताही येत नव्हते. हा अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार लक्षात येताच आईने पिडित मुलासह पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 377, 506, 34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इरफान उर्फ गोल्या जफर सैय्यद यास अटक करण्यात आली आहे. तर अनिकेत रामराव दनके हा आरोपी फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे करीत आहे. 
मोठ्या भावावरच होता डोळा –
या घटनेच्या सुमारे एक तास अगोदर आरोपींनी दहा वर्षीय मुलाच्या मोठ्या भावास बोलवण्यासाठी दणके याच्या भाच्याला पाठवले होते. साडेअकरा वाजेच्या सुमारास अनिकेत दनकेचा 3 वर्षीय भाचा पिडित मुलांच्या घरी गेला. व मोठ्या भावास म्हणाला की, तुला माझ्या मामाने घरी बोलावले आहे. मात्र तो अभ्यास करतोय, येत नाही म्हणून सांग. असे पिडित मुलांची आई म्हणाली होती. त्यानंतर लहान भाऊ गल्लीत येताच त्याला घरात नेऊन आरोपींनी हा घाणेरडा प्रकार केला.
—————
